Posts

मोदींच्या विजयाची कारणे- भाग २

Image
२. राहुल गांधी आणि काँग्रेस काँग्रेसच्या पराभवाला , उतरणीला आणि भाजपाच्या सर्वदूर पसरण्याला कोणी जबाबदार असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींची सगळ्यात मोठी चूक जर काही असेल तर ती म्हणजे त्यांनी स्वतःची नरेंद्र मोदींबरोबर केलेली तुलना!! राहुल गांधी हे कर्तुत्वानी अथवा व्यक्तिमत्वानी नरेंद्र मोदींच्या जवळपास देखील पोहोचत नाहीत. राहुल गांधी हे एका हिमालयाएवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाशी लढत होते. मोदी ३ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते नंतर भाजपाच्या २८२ जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या आणि पंतप्रधान झाले. त्यासमोर राहुल गांधींच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत उल्लेखनीय असं काहीच नाही. राज्यांच्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जर काँग्रेसनी जिंकल्या असतील तर त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा त्या त्या राज्यातल्या स्थानिक नेतृत्वाचा आहे. परंतु काँग्रेसच्या परंपरेनुसार जेव्हा विजय होतो तेव्हा तो गांधींमुळे असतो परंतु जेव्हा पराभव होतो तेव्हा तो गांधी सोडून सगळ्यांमुळे असतो. राहुल गांधींवर भाजपाने आणि मोदींनी नेहमीच वंशवादाचा ठपका ठेवला आहे. परंतु ह्या आरोपाचे उत्तर केवळ आण...

मोदींच्या विजयाची कारणे- भाग १

Image
२०१९ सालच्या सतराव्या लोकसभेचे निकाल हाती आले. सत्ताधारी भाजप पक्षाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या. एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा ३५३ पर्यंत गेला. २०१४ पेक्षा एकट्या भाजपच्या ३१ जागा वाढल्या. राष्ट्रीय आणि स्थानिक अश्या सगळ्याच पातळीवरच्या लोकांनी गेल्या ६ महिन्यात वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हा निकाल एकदमच वेगळा निघाला. म्हणूनच कि काय राज ठाकरेंनी ह्या निकालाचं "अनाकलनीय" असं वर्णन केलं. म्हणूनच ह्या विजयाचं विश्लेषण महत्वाचं ठरतं. देशपातळीवरचे सर्वच पत्रकार मोदी सरकार गेल्यातच जमा आहे , जमिनीवर वस्तुस्थिती दिसते आहे आणि सरकार जाणं ही केवळ औपचारिकता आहे असं सांगून टाकलेलं असताना मोदी हे पुन्हा गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्क्यानी निवडून येतात ही सामान्य गोष्ट नाही. मोदींच्या विजयाची काही ठळक कारणं आपण बघू १. स्वतः मोदी मोदी ही व्यक्ती आजवर कोणालाच समजलेली नाही हे ह्या निकालावरून स्पष्ट होतं. ही निवडणूक केवळ मोदी ह्या नावाभोवती फिरत राहिली. मोदींची हीच इच्छा होती. आणि ही इच्छा त्यांच्या समर्थकांपेक्षा देखील त्यांच्या विरोधकांनी पूर्ण केली. मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरील आ...